BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

मेक इन इंडिया मुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल - अमिताभ कांत

NEXT ARTICLE

केदारनाथ

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशास केरळ सरकार तयार

Published: 2016-11-07 06:17 PM IST

 

नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर, : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यास केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयात तयारी दर्शवली आहे. मात्र, केरळ सरकारने २००७मध्ये न्यायालयात प्रवेशाला विरोध असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यानंतर आता केरळ सरकार आता आपली भूमिका बदलू शकत नाही असे मंदीर प्रशासनाने म्हटले आहे. याबाबतची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
 
केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणे म्हणजे महिलांबाबत  भेदभाव करण्यासारखे आहे, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. २००७मध्ये सरकारने मंदिर प्रशासनाच्या बाजूने कौल दिला होता. धार्मिक परंपरेच्या विरोधात जाऊन महिलांना मंदीरात प्रवेश देता येणार नाही, असे सरकारनेही सांगितले होते. शबरीमला मंदीरात १० ते ५० वर्षाच्या महिलांना प्रवेश करता येत नाही. ही प्रथा १५०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.
STAY IN TOUCH!

LATEST NEWS