BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

व्होडाफोन ग्राहकांसाठी ४९९ रुपयांची खास ऑफर

NEXT ARTICLE

गो-एअरकडून ७३६ रुपयांमध्ये देशभरात कुठेही विमानप्रवास

पृथ्वी-२ चे यशस्वी प्रक्षेपण

Published: 2016-11-22 11:35 AM IST

 

बालेश्वर,   पृथ्वी-२ या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एकीकृत प्रक्षेपण श्रेणीच्या मोबाईल लॉन्चरच्या सहाय्याने सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी ओडिसाच्या चांदीपूर येथील तळावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. ही क्षेपणास्त्रे ३५० किमीच्या परिसरात मारा करण्यास सक्षम असून ५०० ते १००० किलोग्रॉम इतक्या वजनाची अण्वास्त्रे नेण्यास ती सक्षम आहेत.

ओडिसामधील टेलीमेट्री स्थानके, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणाली व संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या रडारच्या सहाय्याने नजर ठेवण्यात आली. भारतीय लष्करात २००३ मध्ये या क्षेपणास्त्राचा समावेश करण्यात आला होता. या क्षेपणास्त्रास संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास योजनेअंतर्गत विकसित करण्यात आले आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS