BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

पृथ्वी-२ चे यशस्वी प्रक्षेपण

NEXT ARTICLE

भारती एअरटेल ने सुरू केली पहिली पेमेंट बँक

गो-एअरकडून ७३६ रुपयांमध्ये देशभरात कुठेही विमानप्रवास

Published: 2016-11-24 04:52 PM IST

 

चेन्नई,  स्वस्त दरात विमानप्रवास करता यावा, यासाठी गो-एअर कंपनीने नवीन खास योजना आणली आहे. या नुसार देशभरात कुठेही केवळ ७३६ रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे.

ही योजना ९ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यानच्या प्रवासासाठी ही सवलत उपलब्ध असणार आहे. ही योजनेचा लाभ २६ नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. गो एअरच्या संकेतस्थळावरून तिकीटे आरक्षित करणाऱ्यांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे, अशी माहिती कंपनीकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली. लहान मुलांसाठी आणि समूह आरक्षणासाठी ही योजना लागू नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर आज रात्रीपर्यंत कंपनीच्या आरक्षण खिडकीवर या नोटा स्वीकारल्या जाणार असून ही तिकिटे रद्द करता येणार नाहीत किंवा बदलून दिली जाणार नसल्याचेही यात म्हटले आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS