BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

गो-एअरकडून ७३६ रुपयांमध्ये देशभरात कुठेही विमानप्रवास

NEXT ARTICLE

ई-कॉमर्स संकेतस्थळाची चुक; ८ हजारच्या मोबाईलची किंमत ७४ हजार

भारती एअरटेल ने सुरू केली पहिली पेमेंट बँक

Published: 2016-11-24 05:14 PM IST

 

मुंबई, भारतीय टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने पहिली पेमेंट बँक सुरू केली आहे. ११ एप्रिल २०१६ रोजीच रिझर्व्ह बँकेने एअरटेलला पेमेंट बँकेसाठी परवाना दिला आहे.

एअरटेलचा हा प्रकल्प राजस्थानमधून सुरू होणार असून तेथे चाचणीनंतर संपूर्ण देशभर ऑनलाईन पेमेंट सर्व्हिस सुरु केली जाणार आहे. ही बँक बचत खात्यांवर ७.२५ टक्के व्याजदर देणार असल्याचेही सांगितले.

बँकिंग क्षेत्रात एअरटेल पेमेंट्स बँक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आशावाद एअरटेल पेमेंट  बँकचे अध्यक्ष शशी अरोरा यांनी व्यक्त केला आहे. राजस्थानमध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पाच्या माध्यामातून एअरटेलने या क्षेत्रात शिरकाव करायला सुरूवात केली आहे. लवकरच संपूर्ण भारतभर या सेवेची सुरुवात केली जाईल, असेही ते म्हणाले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS