BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची दर्पोक्ती

NEXT ARTICLE

नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के

संस्थेवर बंदी हटवण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करू - झाकीर नाईक

Published: 2016-11-26 04:20 PM IST

 

नवी दिल्ली,  आपल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेवरील बंदी उठवण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करणार असल्याचे इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक यांनी सांगितले आहे. झाकीर नाईकने एक जाहीर पत्र लिहून ही प्रतिक्रिया दिली आहे.

माझे कार्य आता सर्वदूर पसरले आहे. त्यामुळे भारतात संस्थेवर बंदी घातल्याने ते निष्फळ ठरणार नाही. अन्य देशांनी मला अपेक्षेपेक्षा अधिक चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु भारत माझा देश आहे. त्यामुळे ही बंदी उठवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन, असे ते म्हणाले. कोणावरही कधीच अन्याय होऊ देऊ नये, ही इस्लामची शिकवण आहे. त्यामुळे मी या बंदी विरोधात लढेन, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. राजेश्वर सिंह, योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची हेदेखील चिथावणीखोर विधाने करतात. पण त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS