BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे २६/११ अतिरेकी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतीला अभिवादन

NEXT ARTICLE

आचारसंहिता काळात २६ कोटींची रोख रक्कम, अवैध मद्य जप्त – सहारिया

नगरपालिकांच्या मतदानाला सुरुवात

Published: 2016-11-27 10:52 AM IST

 

मुंबई,  राज्यातील २५ जिल्ह्यांमधील १६४ नगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी १५ हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. १४७ पालिकांच्या नगराध्यक्षपदांची थेट निवडणूक होणार असून त्यासाठी एक हजार उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचे चित्र आहे.

या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी नेत्यांची कसोटी लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, मुंबई, ठाणे, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये सत्ता असणाऱ्या शिवसेनेलाही नगरपालिकांमध्ये शिरकाव करण्यासाठी कसोशिने प्रयत्न करावे लागणार आहेत. एकूण ४१३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यापैकी १२ केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर १०४ संवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS