BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के

NEXT ARTICLE

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद मलिक याला अटक

आयसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणातील आणखी एका तरुणाचा मृत्यू

Published: 2016-11-29 11:26 AM IST

 

कल्याण,  मे २०१४ मध्ये म्हणजेच साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी कल्याणातून ४ तरुण सिरियाच्या आयसिस संघटनेत भरती झाले होते. त्यापैकी आणखी एका तरुण अमन तांडेल याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराकवर सध्या सुरू असणाऱ्या हवाई हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. या माहितीला कल्याणातील माजी काँग्रेस नगरसेवक इफतीकार खान यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.
शनिवारी रात्री ११.३०च्या सुमारास या तरुणाच्या कुटुंबियांना तुर्कीहून फोन आला होता. त्यावेळी वडिलांशी बोलताना फोनवरील संबंधित व्यक्तीने सुरुवातीला इतर बोलणी केली आणि काही वेळाने तुमचा मुलगा हवाई हल्ल्यात मारला गेला आहे असे सांगत लगेचच फोन ठेऊन दिल्याचे खान यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित तरुणाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आमच्या परिसरात हे कुटुंब अतिशय उच्चशिक्षित, साधे आणि शांत म्हणून प्रसिद्ध आहे. असे असताना हा तरुण कसा काय आयसिसमध्ये भरती झाला? हा प्रश्न त्याच्या कुटुंबियांसह आम्हालाही पडल्याचे इफतीकार खान यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात आली आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS