BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

भारती एअरटेल ने सुरू केली पहिली पेमेंट बँक

NEXT ARTICLE

स्पाईटजेट करणार २०५ विमानांची खरेदी !

ई-कॉमर्स संकेतस्थळाची चुक; ८ हजारच्या मोबाईलची किंमत ७४ हजार

Published: 2016-11-29 11:52 AM IST

 

नवी दिल्ली, ई कॉमर्स संकेतस्थळांमध्ये सुट देण्यावरून सुरू असलेल्या चढाओढीच्या पार्श्वभूमीवर स्नॅपडीलकडून एक मोठी चुक झाल्याचे निदर्शनास आले आहे. स्नॅपडीलने पॅनासॉनिक या कंपनीच्या एल्युगा ८ जीबी ग्रे मॉडेलवर तब्बल ९१ टक्क्यांची सुट दिली आहे. या मोबाईलची किंमत ७४ हजार ८९० असल्याचे कंपनीने आपल्या संकेतस्थळावर नमूद केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ९१ टक्क्यांची सुट देऊन या मोबाईलची विक्री ६ हजार ९५० रूपयांना करण्यात येत आहे. मात्र या कंपनीकडून आपल्या संकेतस्थळावर या मोबाईलची किंमत चुकीची देण्यात आली आहे.

पॅनासॉनिकने आपल्या एल्युगा ८ जीबी या मॉडेलची निर्मिती करणे बंद केले आहे. त्यानंतर कंपनीने या मॉडेलला अपग्रेड करत अनेक नवी मॉडेल्स बाजारात आणली आहेत. ज्यावेळी हा मोबाईल कंपनीनकडून सर्वप्रथम सादर करण्यात आला त्यावेळी या मोबाईलची किंमत केवळ ८ हजार रूपये होती. मात्र यावेळी स्नॅपडीलने याची किंमत ७४ हजार ८९० असल्याचे दाखवले आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS