BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

हत्तींच्या हल्ल्यात ४६२ जणांचा, तर वाघांच्या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू - अनिल दवे

NEXT ARTICLE

डिजिटल व्यवहार करणा-यांना मोदी सरकार देणार बक्षीस

जयललिता यांच्या निधनाने राजकारणात पोकळी - पंतप्रधान

Published: 2016-12-06 12:07 PM IST

 

नवी दिल्ली जयललिता यांच्या निधनाने राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या निधनाने आपल्याला फार दु:ख झाले असून त्या कायमच एक प्रेरणा असतील. त्यांचा तळागाळातील जनतेशीही चांगला संपर्क होता. त्या गरीबांचीही आपलेपणाने काळजी घेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जयललिता यांच्या अंत्यदर्शनासाठी आज चेन्नईला जाणार होणार आहेत. याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू आणि केंद्रीय मंत्री राधाकृष्णन हे ही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS