BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

नवाब मलिक यांच्या सभेत गोळीबार

NEXT ARTICLE

चलन समस्येबाबत साता-यात १३ डिसेंबरला रस्ता रोको

मराठा आरक्षण : उच्च न्यायालयात अडीच हजार पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

Published: 2016-12-06 12:14 PM IST

 

मुंबई,  मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अडीच हजार पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ८० टक्क्यांहून अधिक मराठा समाज हा मागासलेला असून कर्जबाजारी शेतक-यांमध्ये मराठा समाजातील शेतक-यांचा समावेश सर्वाधिक असल्याचा दावा सरकारने यामध्ये केला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुभाषित, अभंगांचा दाखलाही देण्यात आला आहे. पुण्यातील एका संस्थेमार्फत मराठा समाजातील सद्यस्थितीविषयी अहवाल मागण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे हे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती आहे. राज्यातील एकूण ३२ टक्के मराठा समाज आहे. यातील ८० टक्के समाज हा मागासवर्गीय असून आत्महत्या करणारे आणि कर्जबाजारी शेतक-यांमध्ये सर्वाधिक शेतकरी हे मराठा समाजातील असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटल्याचे वृत्त आहे. याशिवाय मराठा समाजातील बहुसंख्य लोकांचे वार्षिक उत्पन्नही कमी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS