BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद मलिक याला अटक

NEXT ARTICLE

स्वराज यांच्यावर निशाणा साधणा-या शोभा डे ट्वीटरकरांच्या निशाण्यावर

आयएनएस बेतवा युद्धनौकेला अपघात; दोन कर्मचा-यांचा मृत्यू

Published: 2016-12-06 01:39 PM IST

 

मुंबई, आयएनएस बेतवा युद्धनौकेला मुंबईजवळच्या समुद्रात अपघात झाला. गोदीतून समुद्रात उतरवत असतांना दुपारी १.५० च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये युद्धनौकेची मोठी हानी झाली आहे. तांत्रिक कारणांमुळे युद्धनौकेला अपघात झाल्याचे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी.के. शर्मा यांनी सांगितले. अथक प्रयत्नांनंतर ३२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून १४ जण जखमी आहेत, तर दोन कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

युद्धनौका दुरुस्तीसाठी गोदीत आणण्यात आली होती. दुरुस्तीनंतर समुद्रात उतरवत असतांना युद्धनौका डावीकडे झुकून हा अपघात झाल्याचे समजते. ब्रह्मपुत्रा हे क्षेपणास्त्र असलेल्या या युद्धनौकेचे वजन तीन हजार ८०० टन आहे. ही युद्धनौका २००४ मध्ये नौदलाच्या ताफ्यात सामील झाली होती.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS