BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

कॅन्सर उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षाद्वारे प्रवेश

Published: 2016-12-06 01:45 PM IST

 

मुंबई, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून आरोग्य विज्ञानाच्या सर्व व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा या अखिल भारतीय स्तरावरील सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे.

केंद्र शासनाच्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय, दंत महाविद्यालयांचे प्रवेश हे एमएचटी-सीईटी या परीक्षेद्वारे घेण्यात आले. खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील प्रवेश हे नीट या परीक्षेच्या गुणवत्तेनुसार घेण्यात आले. आयुर्वेद व युनानी शाखेतील पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे सुद्धा नीट या सामाईक परीक्षेमार्फत द्यावेत याबाबतचा निर्णय विचाराधीन होता. राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी आरोग्य विज्ञानाच्या सर्व व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय पात्रता प्रवेश (छएएढ) या परीक्षेतील गुणवत्तेनुसारच होणार आहे. आरोग्य विज्ञानाच्या सर्व व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया विहित परीक्षेतील गुणवत्तेनुसार राबविची जबाबदारी आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा, महाराष्ट्र राज्य यांची राहिल. हा शासन निर्णय क्रमांक सीईटी-३५१६/प्र.क्र.४४१/१६/शिक्षण-२, दिनांक ०१.१२.२०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS