BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

चौथ्या कसोटीतही पार्थिवच यष्टीरक्षक

NEXT ARTICLE

भारताविरुद्ध आक्रमकतेने खेळायला हवे - नॅथन लियोन

२०१९ मध्ये फुटबॉल आणि बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचे राज्याचे उद्दीष्ट - विनोद तावडे

Published: 2016-12-11 06:12 PM IST

 

मुंबई, राज्यातील क्रीडा संस्कृतीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहित करण्यासाठी २०१९ मध्ये राज्य सरकार फुटबॉल आणि बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय शालेय चॅम्पियनशीपच्या स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करीत आहे. राज्यातील तळागाळातील क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा राज्य सरकार आयोजित करणार असल्याचे क्रीडा मंत्री श्री.विनोद तावडे यांनी आज सांगितले.

इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट फेडरेशनच्या ४ दिवस चालणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला आज प्रारंभ झाला. या बैठकीचे उद्घाटन क्रीडा मंत्री श्री.विनोद तावडे यांनी केले. या बैठकीमध्ये ४५ देशांचे प्रतिनीधी सहभागी झाले आहेत. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नैपुण्य दाखविण्यासाठी करावयाच्या विविध योजनांसंदर्भात या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा झाली. महाराष्ट्रासह भारतात खेळविण्यात येणाऱ्या शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय सहभाग कसा करता येईल जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होईल याची चर्चाही आजच्या बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आली.

शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमधून राज्यासाठी व देशासाठी चांगले खेळाडू तयार होतात म्हणून या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी तयार होणे व त्यांच्यामध्ये खिलाडू वृत्ती तयार करण्याचे काम या स्पर्धांच्या माध्यमातून होते. प्रगत देशांप्रमाणेच भारतातही खेळाला अधिक महत्व देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना असून त्यादृष्टीने खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्तम योजना आखल्या आहेत. या योजनांची माहिती तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंसाठी असलेल्या या योजना आणि उपक्रमांची माहिती याची चर्चा आजच्या बैठकीमध्ये करण्यात आली. या बैठकीसाठी ४५ देशांचे प्रतिनिधी यामध्ये इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष लॉरेंट पेट्रीयंका, महासचिव जॉन कुलन, क्रीडा विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी, सहसंचालक नरेंद्र सोपल, उपसंचालक नागेश मोटे आणि राजेश मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS