BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

मराठा आरक्षण : उच्च न्यायालयात अडीच हजार पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

NEXT ARTICLE

आदित्य ठाकरेंच्या बीएमडब्ल्यू गाडीला अपघात

चलन समस्येबाबत साता-यात १३ डिसेंबरला रस्ता रोको

Published: 2016-12-11 06:13 PM IST

 

सातारा, आवश्यक तेवढा भरणा स्वीकारत नसल्याने आणि स्वीकारलेल्या भरण्याच्या प्रमाणात नव्या व इतर नोटा स्टेट बँक ऑफ इंडिया देत नसल्याच्या निषेधार्थ जनता बँकेच्या वतीने मंगळवार, दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतापगंज पेठ शाखेसमोर रस्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. जनता बँकेच्या मागण्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जनता बँकेकडे असलेले जुने चलन स्वीकारणार असून रिझवर्हे बँकेकडून ज्या प्रमाणात चलन उपलब्ध होईल त्याप्रमाणात बँकेला चलनपुरवठा करण्यात येईल. त्याचप्रमाणे सध्या ३० लाख रुपये चलन उपलब्ध करुन दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती जनता बँकेचे संचालक व भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

 भारत सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी दि. ८ नोव्हेंबर पासून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर जनता बँकेच्या सर्व शाखात ४० ते ४५ कोटी रुपयांचा भरणा झाला होता.जिल्ह्याची करन्सी चेस्ट स्टेट बँक ऑफ इंडिया असून त्यांची जबाबदारी इतर बँकांकडून जुन्या नोटा स्वीकारणे व त्या प्रमाणात नव्या नोटा बँकांना देणे अशी आहे. परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया आवश्यक तेवढा भरणा स्वीकारत नाही व आवश्यकतेनुसार नवीन नोटा व इतर नोटा देत नाही. त्यामुळे जनता  बँकेच्या ग्राहकांना दैनंदिन व्यवहारासाठी पैसे देता येणे शक्य होत नाही. त्याशिवाय बँकांच्या रोजच्या क्लिअरींगसाठी आवश्यक असणारी रक्कम भरणा न स्वीकारल्या कारणाने बँकांचे क्लिअरींग पुरेसा भरणा शिल्लक नाही या कारणाने परत जात आहे.

 नॅशनलाईज बँका या सहकारी बँकांना सापत्नपणाची वागणूक देत असल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जनता सहकारी बँकेचे संचालक, कर्मचारी, ठेवीदार, खातेदार आणि सभासद यांना घेवून मंगळवारी सकाळी ११ वाजता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतापगंज पेठ शाखेसमोर रस्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.  याबाबत बँकेशी पत्रव्यवहारही करण्यात आला होता. सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय आणि बँकेची होणारी गैरसोयीमुळे स्टेट बँक ऑफ इंड़ियाच्या अधिका-यांनी बँकेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जनता बँकेकडे जमा झालेल्या चलनापैकी ५ कोटी रुपयांचे चलन स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वीकारले असून उर्वरित चलन मंगळवारी स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. तसेच ३० लाख रुपयांचे नवीन चलन उपलब्ध करुन दिले आहे. त्याचप्रमाणे रिझवर्ह बँक इंडियाकडून ज्याप्रमाणात चलन पुरवठा होईल त्याचा समन्यायी पध्दतीने पुरवठा करण्यात येईल असे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे मंगळवारी होणारे आंदोलन स्थगित केल्याचे विनोद कुलकर्णी यांनी सांगितले  आहे. आंदोलनाची भूमिका जाहीर केल्यानंतर बँकेचे संचालक, सभासद, खातेदार या सर्वांनी पाठिंबा दर्शवला होता त्याबद्दल संचालक मंडळाच्यावतीने सर्वांचे विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नोकरदार वर्ग भरडला जात आहे. नोटाबंदीचा निर्णय कलेक्टर किंवा राज्य शासनाचा नाही तर, केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातार्‍यात नोटाबंदीच्या विरोधात मोर्चा काढून येथील जनतेला वेठीस धरुन उदयनराजेंना काय साध्य करायचे आहे? सातारा आणि कराडात कोण मोदी, आमच्याकडे पेढेवाला मोदी आहे, अशी गल्लीत स्टंटबाजी करण्यापेक्षा उदयनराजेंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आवाज उठवणे रास्त आहे. मात्र, जनहितापेक्षा ङ्गोटोसेशन आणि पेपरबाजीला महत्व देणार्‍या खासदारांनी आपले कर्तव्य कधीच पार पाडले नाही. खरचं नोटाबंदीला विरोध करायचा असेल तर, उदयनराजेंनी मोर्चाची नौटंकी थांबवावी आणि खासदार म्हणून आपले कर्तव्य दिल्लीत पार पाडावे, असा टोला आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

     याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागे लोकसभा निवडणूकीच्या प्रारंभी उदयनराजेंनी भुमाता दिंडीची नौटंकी केली होते. निवडणूक झाली की ही दिंडी गायब झाली. त्याचे पुढे काय झाले? शेतकर्‍यांना त्याचा किती ङ्गायदा झाला? याबाबत अवाक्षरही काढले जात नाही. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तोच प्रकार उदयनराजे करु पहात आहेत. तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या जनतेने खासदार म्हणून निवडूण दिले आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेसाठी दिल्लीत आवाज उठवण्यासाठी एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जनतेने संधी दिली आहे. पण, खुर्चीसाठी दिंडी, मोर्चा अशी नौटंकी करण्यापेक्षा तुम्ही खासदारकीचे कर्तव्य म्हणून आजवर काय केले आहे का? नोटाबंदीचा निर्णय हा केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचा आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य, शेतकरी आणि नोकरदार वर्ग भरडून निघत आहे. जिल्हा बँकांच्या व्यवहारावरही निर्बंध आल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अर्थवाहीनी आहे. मात्र नोटाबंदीमुळे याहीही बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. तुम्ही खासदार तर आहातच पण, सातारा जिल्हा बँकेचे संचालकही आहात. लोकसभेचे अधिवेशन चालू असताना तुम्ही तिथे नोटाबंदीच्या विरोधात आवाज उठवणे अपेक्षित असताना इथे सातार्‍यात मोर्चाची नौटंकी कशाला हवी, असा सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे.

     नोटाबंदीच्या विरोधात सातार्‍यात मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार, त्याने नोटाबंदीचा निर्णय बदलणार आहे का? हा निर्णय का जिल्हाधिकारी बदलणार ना राज्य सरकार बदलणार आहे. स्वत: शरद पवार यांनी एक खासदार म्हणून पी. चिदंबरम यांना भेटून नोटाबंदीबाबत आवाज उठवला आहे. शिवसेनेच्या खासदारांनीही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत स्वत:हून अरुण जेटली यांची भेट घेतल्याचे आपण वृत्तपत्रातून वाचतो. मग, तुम्ही एक खासदार म्हणून नोटाबंदीच्या विरोधात काय केले? जिल्ह्यातील जनतेवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात दिल्लीत आवाज उठवणे हे तुमचे कर्तव्य आहे का नाही? तुम्ही तुमचे कर्तव्य कधी पार पाडणार? हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्‍न आहे. खरेच नोटाबंदीला विरोध करायचा असेल, जनसामान्यांना खरचं न्याय मिळवून द्यायचा असेल तर, तुम्ही लोकसभेच्या अधिवेशनाला हजेरी लावून तिथे, सभागृहात कोण मोदी? हा प्रश्‍न विचारणे संयुक्तिक ठरले असते. निवडणूका आल्या की, तुम्हाला शेतकर्‍यांविषयी कळवळा वाटू लागतो. जनसामान्यांची तुम्हाला आठवण येते. हे कधीतरी थांबले पाहिजे, असे तुम्हाला वाटत नाही का?

     भ्रष्टाचाराबाबत तुमची भुमिका चांगली आहे पण, सर्वात जास्त भ्रष्टाचार आणि जनतेची लूट होत असेल तर ती महामार्गावरील टोलनाक्यांवर होत असते. महामार्गावरील रस्त्यांची दुरावस्था झालेली असताना टोल नाक्यावर पैसे उकळण्याचा उद्योग सुरु असतो. याबाबत आपण कधीच आवाज उठवला नाही. सातारा जिल्ह्यात हे टोलनाके कोणाच्या आशिर्वादाने चालले आहेत? याठिकाणी होणारी लूट याबाबत आपले मौन का? हाही भ्रष्टाचार उजेडात आणा. टोलनाक्यावरील लूटीचा वाटा कोणाच्यातरी खिशात जातो, असेच समजायचे का? असा सवालही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला खरचं सातारच्या जनतेबद्दल कळवळा असेल तर, तुम्ही नोटाबंदीविरोधात लोकसभेत आवाजत उठवून जनसामान्यांना न्याय देणे अपेक्षित आहे. दिल्ली सोडून इथे गल्लीत नोटाबंदीसाठी मोर्चा काढून नोटाबंदी चा निर्णय बदलणार आहे का? वेड पांघरुन पेडगावला जायचे धोरण आपण थांबवणारच नाही का? जनसामान्यांना वेठीस धरुन मोर्चाची नौटंकी कशासाठी? आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी सुरु असलेला हा ङ्गार्स आणि शेतकरी, जनसामान्यांच्याविषयी असलेले बेडगी प्रेम नौटंकी करुन व्यक्त करण्यापेक्षा तिथे नरेंद्र मोदींसमोर तुमचे वजन दाखवा, असा खोचक सल्ला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS