BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

जयललिता यांच्या निधनाने राजकारणात पोकळी - पंतप्रधान

NEXT ARTICLE

मकरसंक्रांतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना शुभेच्छा

डिजिटल व्यवहार करणा-यांना मोदी सरकार देणार बक्षीस

Published: 2016-12-11 06:47 PM IST

 

नवी दिल्ली,  डिजिटल व्यवहारांकडे आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार रोज नवनव्या योजना घेऊन येत आहे. जास्तीत जास्त नागरिक डिजिटल व्यवहारांकडे आकर्षित व्हावे यासाठी साप्ताहिक आणि त्रैमासिक पातळीवर बक्षीस जाहीर करण्याच्या सुचना नीति आयोगाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनला दिल्या आहेत. यानुसार प्रत्येक आठवड्याला एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. तर दर तीन महिन्याला मोठे बक्षीस देण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या बक्षिसाच्या रूपात एक कोटी रूपये देण्यात येणार आहेत. दर आठवड्याला दहा लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

प्रत्येक आठवड्याला दहा नागरिकांना आणि दहा व्यावसायिकांना बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना गरीब, मध्यम वर्ग आणि छोट्या व्यावसायिकांना लक्षात ठेवून आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ८ नोव्हेंबर नंतर डिजिटल पद्धतीने व्यवहार करणा-यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS