BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

२०० कि.मी. प्रति तास वेगाने धावणारी इंजिने लवकरच भारतात येणार

NEXT ARTICLE

३१ मार्चनंतर जिओ तर्फे दरमहा ३०३ रु. मध्ये अमर्यादित डेटा

अंतराळ स्थानक तयार करण्यास इस्त्रो सक्षम - ए.एस. किरण कुमार

Published: 2017-02-21 05:43 PM IST

 

इंदौर, पहिले अंतराळ स्थानक तयार करण्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्था सक्षम असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सांगितले. रमण्णा औद्योगिक केंद्राच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ज्या दिवशी सरकारकडून याबाबत विचारणा केली जाईल आम्ही या योजनेसाठी होकार देऊ, असेही ते म्हणाले. आता केवळ धोरण तयार करून आवश्यक निधी मिळणे बाकी आहे. अंतराळ स्थानक तयार करण्यासाठी दुरदृष्टी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलणे योग्य ठरेल असेही ते म्हणाले. पृथ्वीवर लक्ष ठेवण्यासाठी, हवामानाबाबतचे तपशील जाणून घेण्यासाठी व दूरसंचार सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी अपकाशातील उपग्रहांच्या संख्येत वाढ होण्याची गरज आहे. देशात छोटे उपग्रह बनवणा-या संस्थांमध्ये वाढ होत असली तरी त्यांच्याकडे प्रक्षेपण करण्याची क्षमता नसल्याचेही त्यांनी सांगितले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS