BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी खा. महमूद मदनी यांचा जामीन मंजूर

NEXT ARTICLE

काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात एक दहशतवादी ठार

एक हजार रुपयाची नवी नोट लवकरच चलनात येणार

Published: 2017-02-21 05:53 PM IST

 

मुंबई, हजार रुपयाची नवी नोट लवकरच चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या.

हजार रुपयाच्या नव्या नोटा जानेवारीतच चलनात आणल्या जाणार होत्या. परंतु पाचशे रुपयांच्या नोटांच्या छपाईचे काम सुरु असल्याने हजार रुपयांच्या नोटांची छपाई लांबणीवर पडली, असे त्यांनी सांगितले. हजार रुपयांची नवी नोट नक्की केव्हा चलनात येईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. निश्चलनीकरणामुळे पाचशे आणि हजार रुपयांचे १५.४४ लाख कोटी रुपये चलनातून बाद झाले. निश्चलनीकरणानंतर परिस्थिती सामान्य करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून वारंवार अनेक पावले उचलण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून २० फेब्रुवारीपासून बचत खात्यातून रोख रक्कम काढण्याची मर्यादा दर आठवड्याला ५० हजार रुपये करण्यात आली. यापूर्वी ही मर्यादा २४ हजार रुपये इतकी होती. १३ मार्चपासून बचत खात्यातून रोख रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठवले जाणार आहेत.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS