BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

विरोधी पक्षांची जागाही व्यापत आहेत भाजप-शिवसेना; कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे दारुण अपयश चिंताजनक

NEXT ARTICLE

सतलज-यमुना कालव्यावरून पंजाब - हरियाणात तणाव

प्रवेशपूर्व अभियांत्रिकी परीक्षांसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Published: 2017-02-23 07:36 PM IST

 

नवी दिल्ली,  प्रवेशपूर्व अभियांत्रिकी परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांसंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

व्यापमं आणि शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याप्रमाणे प्रवेशपूर्व अभियांत्रिकी परीक्षेतही घोटाळा झाला असून या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून करण्यात यावी. त्याचप्रमाणे यातील तोतया विद्यार्थी आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. दरम्यान मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली होती. या याचिकेवर यापूर्वीच निर्णय सुनावण्यात आला आहे, त्यामुळे या प्रकरणात नव्याने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर आज सुनावणी करण्यात आली.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS