BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

निजामपूर येथे २२ फेब्रुवारीला राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियान

अवयवदानाची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल शासकीय रूग्णालयात डॉक्टरांच्या टीमचा सत्कार

Published: 2017-02-23 08:46 PM IST

 

औरंगाबाद ,  घाटी रुग्णालयाने दुस-यांदा इतिहास रचत अवयवदानाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी घाटी रुग्णालयाला भेट दिली. डॉ. सुरेश हरवडे यांच्यासह घाटीच्या सहभागी डॉक्टरांच्या टीमचा सत्कार केला. या वेळी उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, नगरसेवक सचिन खैरे, आशुतोष डंख, हिरा सलामपुरे, गणू पांडे, नारायण कानकाटे, किरण गणोरे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, विभागप्रमुख डॉ. सरोजनी जाधव, घाटीचे अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, डॉ. सुरेश हरवडे, डॉ. जीवन राजपूत, डॉ. बोराळकर, डॉ. जुनेद शेख, डॉ. विप्राम पांडे, डॉ. वीरेन पटेल, डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासह घाटीतील नर्सिंग स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.

हृदय काढण्याच्या प्रक्रियेत डॉ. आनंद देवधर, डॉ. संदीप सिन्हा, यकृतासाठी डॉ. प्रशांत राव, डॉ. अरुण के.,  किडनीसाठी डॉ. अभय महाजन, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. अजय ओसवाल, डॉ. प्रशांत दरक, डॉ. आवरगावकर ब्रेन डेथ टीममध्ये डॉ. मकरंद कांजळकर, डॉ. जीवन राजपूत, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. सुधीर चौधरी

यांच्यासह ग्रीन कॉरिडोरसाठी मेहनत घेणारी पोलीस यंत्रणा नर्सिंग स्टाफ अन चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन खासदार चंद्रकांत खैरे यांनी यांनी या वेळी केले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS