BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशास केरळ सरकार तयार

केदारनाथ

Published: 2017-02-24 07:13 PM IST

 

केदारनाथ गंगोत्रीच्या आग्नेयेस दक्षिण बाजूला आहे .

१) केदारनाथ :- हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे .याची उंची ३५८१ मीटर आहे.हे मंदाकिनी नदीवर आहे .अशी आख्यायिका आहे कि पांडव महाभारत युद्धानंतर पापक्षालनासाठी शंकराचे आशीर्वाद घ्यायला येथे आले होते .शंकराने त्यांना हुलकावणी दिली आणि निघून जातांना केदारनाथ येथे बैलाचे रूप धारण केले.पळतांना शंकराने जमिनीत प्रवेश केला व त्याचे  हंप (म्हणजे मानेवरचे कुबड जेथे जोते ठेवतात .)जमिनीवर राहिले ह्या त्रिकोणी भागाची पूजा करतात.शंकराच्या इतर चार भागांची पूजा  इतर ठिकाणी होते .हात तुंगनाथ येथे,तोंड रुद्रनाथ येथे ,बेंबी मदहेश्वर  येथे ,जटा कपेश्वर येथे .
 ही चार स्थळे आणि केदारनाथ  यांना पंचकेदार म्हणतात . येथील शिवलिंग त्रिकोणी मनोऱ्याच्या आकाराचे आहे .समोरच नंदीची भव्य मूर्ती आहे .हिवाळ्यात ते स्थळ बर्फाच्छादित असते . त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतच दर्शन घडू शकते .
हे स्थळ हृषिकेशहून २२९ किमी अंतरावर आहे.गौरी कुंडापर्यंत रस्ता आहे .पुढे १४ किमी अंतर चालत जावे लागते.ह्या पायवाटेवर रामवरा हे स्थान आहे . राहायला टुरीस्ट होम , आश्रम व धर्मशाळा यात सोय होऊ शकते .

२)शंकराचार्याची समाधी
केदारनाथ मंदिराच्या मागच्या बाजूस आदि शंकराचार्य यांची समाधी आहे .भारतात चार पीठे स्थापन केल्यानंतर त्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी येथे समाधी घेतली.

३)चोरावाटी (गांधी सरोवर)
 २ किमी अंतरावरच्या ह्या ठिकाणी युधिष्ठिराने या तळ्यात आपले जीवन संपविले .

४)वासुकी तळे
 हे तळे ४१३५ मीटर उंचीवर आहे .हे स्थळ ६ किमी अंतरावर आहे .येथून चौरवंबा शिखरे चांगली दिसतात .

५)गौरीकुंड
येथे गौरीचे कुंड आहे .केदारनाथला चालत जावे लागते.हे सोनप्रयागपासून ६ किमी अंतरावर आहे .

६)सोनप्रयाग
हे केदारनाथच्या दक्षिणेस २० किमी आहे .येथे सोनगंगा व मंदाकिनी  या नद्यांचा संगम आहे . येथून त्रिगुणी  नारायणकडे रस्ता जातो .

 ७)गुप्तकाशी
सोनप्रयागच्या दक्षिणेस २६ किमी अंतरावरच्या ह्या स्थळी अर्धनारीश्वर व विश्वनाथाची मंदिरे आहेत .

८)त्रिगुणनारायण
केदारनाथच्या वायव्येस २५ किमी अंतरावर  व सोनप्रयागच्या पश्चिमेस १४ किमी अंतरावर हे स्थळ आहे .येथे शंकर  व पार्वतीचा विवाह झाला .त्याची आठवण म्हणून येथे एक ज्योत अखंड पेटत असते

STAY IN TOUCH!

LATEST NEWS