BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

जवानांना उच्च दर्जाचा , पोषक आहार पुरविणे आमचे कर्तव्य- बीएसएफ

NEXT ARTICLE

राहुल गांधी यांच्यात अद्याप परिपक्वता नाही - शीला दीक्षित

देशाचे आर्थिक नुकसान करणा-यांना धडा शिकवणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Published: 2017-02-24 08:08 PM IST

 

गोंडा देशाचे आर्थिक नुकसान करणा-या लोकांना चांगला धडा शिकवला जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भ्रष्टाचाराविरुद्ध सुरु केलेल्या लढाईमुळे अन्य पक्ष माझे शत्रू झाले. निश्चलीकरणानंतर काही पक्षांनी जनतेमध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला.  मात्र देशातील जनता सत्य परिस्थिती जाणून आहे, तिला कोणी समजावण्याची किंवा दिशाभूल करण्याची गरज नाही,असेही ते म्हणाले.

निश्चलीकरणानंतर देशाची आर्थिक लूट करणारे पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधकांना दिशाची चिंता नसून ते केवळ पैशांसाठी हापापले आहेत. त्यामुळे या लोकांचा हेतू  मी कदापि पूर्ण होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

माझ्यावर उत्तर प्रदेशचे कर्ज आहे, ते मला फेडायचे आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील अंतर मिटवायचे आहे. मी देशाच्या विकासासाठी काम करत आहे. त्यामुळे जनतेने काय योग्य आणि काय अयोग्य याचा नीट विचार करावा. ही  निवडणूक उत्तर प्रदेश आणि देशासाठी महत्वाची आहे. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षावरही निशाणा साधला.

 उत्तर प्रदेशचा विकास समाजवादी , बहुजन समाज पक्षामुळेच रखडल्याचे सांगत  या राज्यात चोरीही लिलाव पद्धतीने होते, असा टोला मोदी यांनी लगावला.

अखिलेश यांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली आहे,मात्र देशातील जनतेने ओडिसा असो किंवा महाराष्ट्र येथून काँग्रेसला संपवले आहे असे पंतप्रधान म्हणाले. 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS