BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

राहुल गांधी यांच्यात अद्याप परिपक्वता नाही - शीला दीक्षित

NEXT ARTICLE

नोटा रद्दच्या निर्णयामुळे काय फायदा झाला, अखिलेश यांचा पंतप्रधानांना सवाल

निश्चलनीकरणाचा निर्णय विनाशकारी - केरळच्या राज्यपालांची टीका

Published: 2017-02-24 08:40 PM IST

 

तिरुवनंतपूरम,  निश्चलनीकरणाचा निर्णय हा देशाच्या इतिहासातील विनाशकारी निर्णय असल्याची टीका न केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांनी केले. केरळ विधानसभेच्या अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी आपल्या अभिभाषणात त्यांनी ही टीका केली .

८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र  सरकारने नोटा रद्दचा निर्णय जबरदस्तीने लागू केला. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. जुन्या नोटा बदलण्याची ठोस प्रणाली उभी करण्यास केंद्र सरकारला अपयश आले आहे, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने सुरूवातीच्या काळात बँक खात्यातून २४ हजार रूपये काढण्याची मर्यादा ठेवण्याचा सरकारचा हा निर्णय निर्दयी होता, असा आरोप त्यांनी केला. या निर्णयामुळे चलनातील ८६ टक्के पैसा बाहेर गेला. रिझर्व्ह बँक ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, याचा प्रमुख या प्रक्रियेत एक मूक भागीदार बनल्याची टीकाही त्यांनी केली. केंद्र सरकारने हा निर्णय लागू करताना गरीब, मध्यमवर्गीय, रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विचार केला गेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS