BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

निश्चलनीकरणाचा निर्णय विनाशकारी - केरळच्या राज्यपालांची टीका

NEXT ARTICLE

मणिपूरमध्ये ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

नोटा रद्दच्या निर्णयामुळे काय फायदा झाला, अखिलेश यांचा पंतप्रधानांना सवाल

Published: 2017-02-25 05:22 PM IST

 

नवी दिल्ली, नोटा रद्दच्या निर्णयामुळे काय फायदा झाला, त्या निर्णयाने गरिबांना कोणता लाभ झाला हे कधी सांगणार आहात, असा सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे. सिद्धार्थनगरमधील निवडणूक प्रचारसभेदरम्यान त्यांनी हा सवाल केला.

भारतीय जनता पक्षाने आमच्या निवडणुकीसाठीच्या आश्वासनाची त्यांच्या जाहीरनाम्यात नक्कल केली आहे. दूरदर्शन व रेडिओवर आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात ऐकली, पण भारतीय जनता पक्षाची मन की बात समजू शकलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी दफनभूमी व स्मशानाबाबत बोलतात मात्र आम्ही लॅपटॉप – स्मार्टफोनबाबत बोलतो. पंतप्रधान मोदी यांनी तीन पानांचे भाषण केले. मात्र त्यात शेतकरी व गरिबांच्या हिताचे काहीच नव्हते, असे ते म्हणाले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS