BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम

NEXT ARTICLE

आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पूजा घाटकरला कांस्य पदक

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर ३३३ धावांनी दणदणीत विजय

Published: 2017-02-25 05:31 PM IST

 

पुणे, फेब्रुवारी भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या तिस-याच दिवशी यजमान भारताला ३३३ धावांनी पराभूत केले. चहापानावेळी भारताची अवस्था ६ बाद ९९ अशी बिकट होती. त्यानंतर भारताने केवळ ८ धावांत उर्वरित ४ गडी गमावले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारतात कोहलीची कर्णधार म्हणून ही पहिलीच हार आहे.फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्याने पाहुण्या कांगारूंना दणदणीत विजय मिळाला.

ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी ठेवलेल्या ४४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंपुढे अक्षरश: गुडघे टेकले. सलामीवीर मुरली विजय (२) आणि लोकेश राहुल (१०) झटपट बाद झाले. कर्णधार कोहली आणि पुजाराने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण,कोहली(३१) आणि त्याच्या पाठोपाठ अजिंक्य रहाणे (१८), अश्विन (८), वृद्धिमान साहा (५) स्वस्तात तंबूत परतले. त्यामुळे भारताची अवस्था ६ बाद ९९ अशी झाली. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण तो ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर तळाचे फलंदाज खेळपट्टीवर फक्त हजेरी लावून गेले आणि भारताचा डाव १०७ धावांत आटोपला. पहिल्या डावात ६ बळी टिपणा-या स्टीव्ह ओयकॅफेने दुस-या डावातही ६ बळी टिपला. नॅथन लिऑनने ४ गडी बाद केले.

सामन्यात १२ बळी टिपणा-या ओयकॅफेला सामनावीर घोषित करण्यात आले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS