BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

देशात लवकरच दुधाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता

शेअर बाजार निर्देशांकात १४४ अंकांची घसरण

Published: 2017-03-03 06:40 PM IST

 

मुंबई, २ मार्च  : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक १४४. ७० अंकांच्या घसरणीसह २८  हजार ८३९. ७९ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकही ४६.०५ अंकांनी वधारून ८ हजार ८९९.७५ वर बंद झाला.

सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३२.८९ अंकांनी वधारून २९ हजार ११७.३८ अंकांवर उघडला. दिवसभरात निर्देशांकाने २८ हजार ७८४.३१चा नीचांकी, तर २९ हजार १४५.६२ चा उच्चांकी स्तर गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ३७.०५ अंकांनी वधारून ८ हजार ९८२.८५ अंकांवर उघडला. दिवसभरात निर्देशांकाने ८ हजार ८७९.८० चा नीचांकी, तर ८ हजार ९९२.५० चा उच्चांकी स्तर गाठला.

बजाज ऑटो, टाटा मोटर्स, सिप्ला, विप्रो, कोल इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर्स आदींच्या समभागांत वाढ झाली. तर, एचडीएफसी बँक, एशियन पेन्ट्स, आयटीसी, इन्फोसीस, गेल, टाटा स्टील आदींच्या समभागांत घसरण झाली.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS