BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

निर्णय शिवसेनेने घ्यावयाचा आहे - नितीन गडकरी

NEXT ARTICLE

नाशिक जिल्ह्यातून ७८४ टन द्राक्ष निर्यात

मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी कॉंग्रेस उमेदवार देणार - संजय निरुपम

Published: 2017-03-03 07:10 PM IST

 

मुंबई, २ मार्च   : मुंबई महापालिकेचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार याबाबतचा तिढा कायम असताना आज महापौर पदासाठी कॉंग्रेस आपला उमेदवार देणार, अशी घोषणा कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज येथे केली.

त्यानंतर शिवसेनेचा महापौरपदासाठीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापौर पदासाठी उमेदवार देण्यासाठी कॉंग्रेसने समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा मागितला आहे.

भाजपचे ८२ व शिवसेनेचे ८४ नगरसेवक जिंकून आले असले तरी दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्याने मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS