BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

ऑनलाईन तिकीट आरक्षणासाठी आधार अनिवार्य

NEXT ARTICLE

धरमशाला ही दुसरी राजधानी करण्याचा प्रस्ताव हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाकडून मंजूर

नक्षलवादी व सरकारमध्ये मध्यस्थी करण्यास तयार - श्री श्री रविशंकर

Published: 2017-03-03 07:21 PM IST

 

भोपाल, २ मार्च,  : नक्षलवादी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेश राज्य विधिमंडळात ते पत्रकारांशी बोलत होते.

नक्षलवाद्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. काही लोकांना याबाबत माहिती नाही. मला अशी संधी मिळाल्यास आपण सरकार आणि नक्षलवाद्यांमध्ये मध्यस्थाची भूमिका घ्यायला तयार असल्याचे ते म्हणाले.

नक्षलवाद्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद हाच मार्ग आहे. काही उद्देश मनात घेऊन ते जंगलात भटकत आहेत. त्यांनाही अनेक बाबींची खंत असणार आहे. संवादाच्या माध्यमातून त्यांच्या अपेक्षा आणि उद्दिष्टांविषयी आपल्याला माहिती होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS