BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

धरमशाला ही दुसरी राजधानी करण्याचा प्रस्ताव हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाकडून मंजूर

NEXT ARTICLE

गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांच्यावर विधानसभेबाहेर बूट फेक

अखेर अवधुत छाया व दत्तकृपा इमारती सिडकोच्या ताब्यात दिल्या

Published: 2017-03-03 07:46 PM IST

 

नवी मुंबई, ०२ मार्च  : अवधुत छाया व दत्तकृपा या दिघा येथील सिडकोच्या भुखडावरील इमारती कोर्ट रिसिवर च्या ताब्यातून  आज सिडकोच्या ताब्यात देण्याची कारवाई करण्यात आली. मंगळवारी अमृतधाम व दुर्गा माता  प्लाझा वर कारवाई होत असताना येथील रहिवाशांनी विरोध केला होता. पण गुरुवारी होणाºया कारवाईला कोणताच विरोध न होताच शांतेता कोर्ट रिसिवर व सिडको प्रशासनाला कारवाई करुन दिली.  

उच्च न्यायलयाने सिडको व एमआयडीसीच्या भुखंडावरील ९९ अनाधिकृत इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीच्या जागेवरील पार्वती, शिवराम व केरु प्लाझा या तीन निवासी इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या आहे. तर अंबिका, कमाकर, पांडूरग, मोरेश्वार, भगतजी या एमआयडीसीच्या भुखंडवरील इमारतीना टोळे टोकण्यात आले आहे.

तर सिडकोच्या भुखंडावरील अमृत धाम, अवधुत छाया, दत्तकृपा, दुर्गा माता प्लाझा या इमारतीना टाळे टोकण्यात आले आहे. आजातयागत पर्यत सुमारे दिद्यातील ४०० कुटुंब बेघर झाले आहेत. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. कारवाई नंतर या मधील रहिवाशांनी भांडयाच्या घराचा असारा घेण्यास सुरु वात केली आहे. कळवा, विटावा, ऐरोली, खारेगाव, कल्याण, डोबिवली, बदलापूर इकडे देखील रहिवाशांनी स्थालंतरीत केले आहे. बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या असून दहावीच्या परीक्षा देखील सुरु होणार आहे. त्यामुळे १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना जायचे कुठे असा प्रश्ना पडला आहे. या दुर्गा माता प्लाझा, व अवधुत या इमारती मधील १२ वी ला चार विद्यार्थी आहे. त्यापैकी एका विद्यार्थ्यांनी घरावर होत असणाºया कारवाई मुळे परीक्षाला देखील दिला नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

आजतागयत पर्यत दिद्यातील होणाºया कारवाईचा स्थानिक नागरिकांकडून  विरोध होत होता. पण प्रसार माध्यमावर दिद्यातील रहिवाशांनी हल्ला केल्या नंतर येथील रहिवांशाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुर्गा माता प्लाझा मधील ५० कुटूब, अमृत धाम ४२, अवधुत छाया ४६ व दत्तकृपा मधील २४ असे १६२ कुटूंब बेघर  या आठवडयात या कारवाइ्मुळे बेघर झाले आहेत. या इमारतीमधील राहिवाशांची भांडयाची घर शोधण्यासाठी वणवण सुरु आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS