BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

अखेर अवधुत छाया व दत्तकृपा इमारती सिडकोच्या ताब्यात दिल्या

NEXT ARTICLE

शासकीय सेवानिवृत्तांना मिळणार कायमस्वरुपी ओळखपत्र

गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांच्यावर विधानसभेबाहेर बूट फेक

Published: 2017-03-03 07:51 PM IST

 

गांधीनगर, २ मार्च,   : गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांच्यावर विधानसभेबाहेर बूट फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. गुजरात विधानसभेबाहेर ते पत्रकारांशी संवाद साधत असताना ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून गोपाल इटादरिया असे त्या तरुणाचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी विधानसभेत भाजप आणि काँग्रेस आमदारांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. त्याची राग मनात धरुन या तरूणाने गृहमंत्र्यांवर बूट फेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भ्रष्टाचारामुळे आपण मंत्र्यांवर बूट फेकला. बेरोजगार तरुणांचा राग यातून व्यक्त करण्यात आला आहे, असे तरूणाने सांगितले आहे.

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS