BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

कुणी रात्र हि मंतरली

NEXT ARTICLE

लहानपण कुंभाराच

गणराया …

Published: 2015-03-25 11:24:36 IST

 

तूच हे गणराया…
करावे बंदिस्त कोठे ?
चित्रात, शब्दात की तुझ्या
श्रद्धेने भरलेल्या माझ्या नयनात …

तूच हे गणराया …
बंदिस्त देवारयात
माझ्या कोमल हृदयात अन
त्यातून निर्माण होणाऱ्या
प्रेमळ भाव – भावनात …

तुझी हे गणराया …
कराया स्तुती नेहमीच
शब्द अपुरे मज पडतात ..
करण्या स्तुती तुझी
तुझ्याच चित्राचे पुष्प
तुझ्या चरणी वाहायचे
तर रंगविण्या रूप तुझे
मज जवळील रंग
का कोणास जाणे
नेहमीच अपुरे पडतात …

तुझी हे गणराया …
पाहत नाही वाट मी
वर्षभर तू येण्याची
कारण सतत असतोस
तू माझ्या अवती – भोवती
कलेच्या रुपात …

तुझ्या हे गणराया …
वाहावे काय चरणात ?
पुसतो सदाच मी प्रश्न स्वत : स
तेव्हा सांगतो मीच मला
ठेव आदर्श गणरायास
होईल पुष्प तेच
तुझ्या श्रद्धेचं त्या
गणरायाच्या चरणात …

कवी – निलेश बामणे

STAY IN TOUCH!

LATEST NEWS