BREAKING NEWS

< >
NEXT ARTICLE

कॉंग्रेस समोर एमआयएमचे आव्हान नाही : अशोक चव्हाण

हदगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

Published: 2015-03-31 07:59:33 IST

 

नांदेड, दि. ३१ मार्च ( न्यूज एजन्सी ) : तालुक्याचे लक्ष लागलेल्या अत्यंत चुरशीच्या व अटीतटीत पार पडलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी हदगांवच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शिवसेना पुरस्कृत श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे १२ पैकी १२ उमेदवार विजयी झाले. या पॅनलचे प्रमुख माजी अध्यक्ष व पत्रकार शिवाजी देशमुख हे होते. तर दुसरीकडे कॉग्रेसच्या शेतरी विकास पॅनलचे प्रमुख गणेश तोष्णीवाल यांनी नेतृत्व केले होते. तालुक्यात सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत हदगांव, वाटेगाव, गोजेगाव, वाकोडा, बेलगव्हाण, पिंगळी, उमरी(द.), डोंगरगाव, फळी कौठा या गावातील शेतकरी सभासदांचा समावेश होता. सुरुवातीलाच या निवडणूकीत शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार माजी नगराध्यक्ष दगडु बसलिंग गोदजे हे ओबीसी प्रवर्गातुन बिनविरोध निवडून आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत श्री दत्त पॅनलचे शिवाजी देशमुख यांना ६५७ मते तर कॉग्रेस पॅनलचे प्रमुख गणेश तोष्णीवाल यांना ४९७ मते पडली. कॉग्रेसच्या तोष्णीवाल यांच्या पॅनलला माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर व खा. राजीव सातव यांनी बळ दिले होते. तर छुप्या पध्दतीने शिवसेनेच्या माजी खासदारांनी पाठिंबा दर्शविला होता. एवढी ताकद पाठीशी असताना व सोसायटीचे अनेक वर्ष अध्यक्षपद भूषविलेल्या तोष्णीवाल यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तर अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने काम करणारे व ग्रामीण भागात मागील पंधरा वर्ष सोसायटीचे संचालक व एक वर्ष अध्यक्ष राहिलेले पत्रकार शिवाजी देशमुख यांना केलेल्या कामाची शेतकर्‍यांनी पावती दिली आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS