BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

इन्स्टट पोहे

NEXT ARTICLE

वरी तांदुळाची खिचडी

इन्स्टट फ्रोजन साबुदाणा खिचडी

Published: 2015-01-13 12:17:30 IST

 

साहित्य :-

  1. दोन वाट्या साबुदाणा
  2. एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  3. सहा-सात हिरव्या मिरच्या
  4. चवीला मीठ , साखर , पाव वाटी तूप
  5. एक चमचा जिरं , एक चमचा लिंबाचा रस .

कृती :-

  1. साबुदाणा आठ-दहा तास भिजवावा .  साबुदाणा धुतल्यानंतर थोडं वरती दिसेल इतकं पाणी ठेवावं म्हणजे साबुदाणा चांगला भिजतो .
  2. तुपाची फोडणी करून मिरच्यांचे तुकडे घालून परतावे .  
  3. साबुदाण्यात मीठ , साखर , शेंगदाण्याचा कूट , लिंबाचा रस आणि फोडणी घालून कालवावं .
  4. हे मिश्रण दोन-तीन दिवसच ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये ठेवावं .
  5. फ्रीजमधील मिश्रण काढून कुकरमध्ये एका ताटलीवर पसरून दोन-तीन मिनिटं वाफ दिली , की खिचडी तयार होते .
  6. मायक्रोवेव्ह असेल तर दोन वाट्या मिश्रण झाकण ठेवून तीन-चार मिनिटं मायक्रो केलं तर मऊ मोकळी खिचडी तयार . ( दीड वाटी मिश्रणाची दोन प्लेट खिचडी होते . )
  7. मिश्रण फ्रीजमधून काढल्यास ते घरातल्या तापमानाला आलं की एक वाफ द्यायची .
  8. मायक्रोवेव्हमध्ये पहिल्यांदा डीफ्रास्त करायचं आणि मग झकण ठेवून वाफ द्यायची .

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS