BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

दलिया सांजा

NEXT ARTICLE

पालक पुरी

डाळ दलिया

Published: 2015-01-13 13:11:27 IST

 

साहित्य :-

  1. एक वाटी दलियाचा रवा शिजवून
  2. अर्धी वाटी हरभरा डाळ
  3. एक वाटी बारीक चिरलेला कांदा
  4. पाच-सहा हिरव्या मिरच्या
  5. आठ-दहा कढीलिंबाची पानं
  6. साखर , हिंग , हळद
  7. दोन मोठे चमचे दुध
  8. एक मोठा चमचा लिंबूरस
  9. फोडणीसाठी मोहरी
  10. चवीनुसार मीठ .

कृती :-

  1. हरभरा डाळ तीन-चार तास भिजत घालून रात्रीच जाडसर वाटून फ्रीजमध्ये     ठेवावी .  तेलाची फोडणी करून त्यात मिरच्या , कढीलिंब परतून त्यावर      कांदा घालून परतावा .   
  2. त्यात डाळ घालून परतावी .  दलिया मोकळा करून घालावा आणि मीठ ,    साखर , लिंबाचा रस घालून ढवळावा . दुध घालून एक वाफ आणावी .
  3. मायक्रोवेव्ह असेल तर भिजलेली डाळ दोन मिनिटं मायक्रो करा .  
  4. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटली की सगळी सारखी वाटली जाईल .  
  5. चिकट न होता भगरा होईल .  फोडणी गैसवर करून बाकी सगळी कृती मायक्रोवेव्हमध्ये करता येईल .  

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS