BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

१० वे आदिवासी साहित्य संमेलन दि. २५ रोजी नांदेडला

NEXT ARTICLE

माऊलींच्या वारीत नियोजनाची वारक-यांना चुकीची माहिती

परंपरेनुसार आषाढीसाठी माऊलींच्या पालखीचे ९ जुलैला प्रस्थान

Published: 2015-05-16 12:15 PM IST

 

आळंदी, दि.१६ मे  : परंपरेनुसार आषाढी यात्रेसाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ९ जुलैला प्रस्थान होणार आहे. आषाढी वारीचे नियोजन ९ जुलैला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम आळंदी देवस्थानाच्या नूतन दर्शन बारी मंडपात होईल. १० जुलैला सोहळा पुण्यनगरीत दोन दिवसांसाठी विसावेल.

१२ जुलैला सोहळा पुढील दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सासवड येथे पोहोचेल. यानंतर या पालखीचा प्रवास १४ जुलै रोजी जेजुरी, १५ जुलै वाल्हे, १६ आणि १७ जुलैचा पाहुणचार घेऊन दि. १८ जुलैला लोणंद येथून तरडगावला सोहळा पोहोचणार आहे. १९ जुलै रोजी फलटण येथे मुक्काम त्यानंतर २० जुलैला बरड,२१ जुलैला नातेपुते,२२ जुलैला माळशिरस,२३ जुलैला वेळापूर,२४ जुलैला भंडीशेगाव,२५ जुलैला वाखरीत मुक्काम होऊनदि. २६ जुलैला पालखी पंढरीत दाखल होईल. २७ जुलैला लाखो वैष्णव विविध धार्मिक कार्यक्रम करीत देवदर्शन घेऊन आषाढी एकादशी साजरी करतील.

येथील पाच दिवसांचा मुक्काम करून १ ऑगस्टला परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. माऊली मंदिरातील प्रथापंरपरांचे पालन करीत या वर्षी १६ जून ते १६ जुलै या कालावधीत अधिकमास विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. अधिक महिना आणि पालखी सोहळा यांचे महत्त्व ओळखून श्रींच्या वारी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS