BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

माऊलींच्या वारीत नियोजनाची वारक-यांना चुकीची माहिती

मंदिरे राज्यकर्त्यांच्या नव्हे, भक्तांच्याच स्वाधीन हवीत ! - शिवयोगी पेरूमल स्वामीजी

Published: 2015-06-12 10:05 PM IST

 

फोंडा, दि. १२ जून  हिंदूंची मंदिरे ही स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. पूर्वीच्या काळी परकीय आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे पाडली. सध्या शासन देशभरात मंदिरांचे सरकारीकरण करून ती कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. मंदिरे राज्यकर्त्यांच्या नाही, तर भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत, असे प्रतिपादन तमिळनाडू येथील तिरुमणी चेरई उदयार चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष शिवयोगी पेरूमल स्वामीजी यांनी केले. गोवा येथे चालू असलेल्या चतुर्थ अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीच्या हिंदु मानबिंदूंच्या रक्षणाविषयीच्या उद्बोधन सत्रात ते बोलत होते. या वेळी हिंदुत्ववादी नेत्यांनी हिंदूंच्या मानबिदूंच्या रक्षणासाठी शासकीय, प्रशासकीय, न्यायालयीन, स्थानिक, तसेच राष्ट्रीय पातळीवर कृतीशील होण्याचा निर्धार केला.

यावेळी उत्तरप्रदेशचे विनोदकुमार सर्वोदय म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहाद, धर्मांतर अशा प्रकारांनी परिसीमा गाठला असली, तरी शासन मात्र लव्ह जिहादविषयी अनभिज्ञ असल्याचे सांगते. तर हिंदूंच्या घरवापसीला विरोध करते. शासनाच्या अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन शासनावर दबाव टाकायला हवा, असे सर्वोदय म्हणाले. उज्जैनच्या स्वदेशी मठाचे आचार्य जितेंद्र आर्य म्हणाले की, काही वर्षांपूर्वी देशी गोवंशाच्या १०० हून अधिक प्रजाती होत्या, आज त्या केवळ ३० उरल्या आहेत. जर्सीसारख्या संकरित गायींची निर्मिती करून देशी गायींची संख्या कमी करणे, हे आंतरराष्ट्रीय प्रायोजित षड्यंत्र आहे. ते हाणून पाडायचे असेल, तर देशातील प्रत्येक व्यक्तीने देश गायीचे दूध, गोपंचगव्य उत्पादनांचा व्यापक स्तरावर वापर करायला हवा, असे जितेंद्र आर्य यांनी सांगितले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS