BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

वाढत्या वयात सौंदर्याची जाणीवपूर्वक काळजी

NEXT ARTICLE

नखांची काळजी

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या

Published: 2015-01-31 07:44:44 IST

 

१) नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे .  चनाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे .
२) दुध पावडर १ टेबल स्पून , मध २ टेबल स्पून , १ चिमुटभर हळद पावडर आणि      अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा , मान , उरल्यास हाताला चोळून लावावी .      वाळल्यानंतर धुऊन टाकावी .  
३) कोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी .  त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे .  हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे .  
४) ओली हळद व मोहरी वाटून दररोज Black हेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावे .  हळू-हळू Black हेडस कमी होतात .
५) ओटचे पीठ , चंदनाचे चूर्ण , १ टेबल स्पून ओट व १/४ टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावे .  थोडया वेळाने धुऊन टाकावे .  कच्च्या बटाट्याचे पातळ चकत्यांसारखे कापून चेहऱ्यावर पसरून बारा-पंधरा मिनिटे शांत पडावे .  नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा .  चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो .  ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी ही कृती उपयोगी आहे .  
६) १ टेबल स्पून ग्लिसरीनमध्ये हर्बल तेल किंवा आवळा तेल ५ ते १० थेंब टाकून चेहऱ्यावर लावावे .  मुलायम मऊ त्वचा होण्यासाठी असे नियमित करावे .  तोंड धुतल्यावर गुलाब पाणी चेहऱ्याला लावावे .  त्वचा मृदू होते .  ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक आहे .  
७) १ लिंबू , १ अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे .  साधारण वीस मिनिटांनी धुवावे .  
८) त्वचा मृदू , मुलायम , स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दह्याने मसाज करावा .
९) त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते .  त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्चरायझर टिकवणे असे म्हणतात .  घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्चरायझर करून त्वचेला चमक आणता येते .  
१०) बाजारात जोजोबा नावाचे तेल मिळते , त्याचे चार-पाच थेंब , तेवढेच खोबऱ्याचे तेल व गुलाबपाणी एकत्र करावे .  चेहरा धुतल्यावर वरील मिश्रण चेहऱ्यावर लावावे .  त्वचेला आर्द्रता तर मिळतेच , शिवाय एक मोहक , दीर्घकाळ रेंगाळणारा सुगंध मिळतो .

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS