BREAKING NEWS

< >

Kokanastha Marathi Movie

 

कोकणस्थ....! Kokanastha Marathi Movie Review

 

नुकताच प्रदर्शित झालेला महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट! ठिकठिकाणी लावलेल्या ह्या चित्रपटाच्या पोस्टर्समध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात उग्र रूप धारण केलेल्या सचिन खेडकरांना बघून चित्रपटाच्या स्वरूपाविषयी सहज कल्पना येते. ‘ताठ कणा, हाच बाणा’ असा संदेश हा चित्रपट देवून जातो. हा चित्रपट म्हणजे रामचंद्र गोविंद गोखले ह्या सेवानिवृत्त मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात घडलेल्या काही अनपेक्षित प्रसंगांमुळे त्याच्या शांततामय जीवनाची झालेली दुर्दश, त्यानंतर अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध पेटून उठलेला सामान्य माणूस ह्या चित्रपटात दाखविला गेलेला आहे. मुख्य भूमिकेत सचिन खेडकर असून सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये, नवोदित कलाकार वैदेही  परशुरामी आणि  रोहन  तळवलकर यांची सुरेख साथ त्यांना लाभली आहे.

ह्यातील लढाऊ सर्वसामान्य मराठी माणूस, उत्कृष्ट मांडणी, पटकथा-संवाद पाहण्या-ऐकण्यासाठी हा चित्रपट निश्चितच पहावासा वाटतो!

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS