BREAKING NEWS

< >

chinese cooking recipes

 

 

 

हक्का नुडल्स
वेळ : ३० मिनिटे, वाढणी २ जणांसाठी



साहित्य : २ नुडल्स केक्स (५० ग्रॉम प्रत्येकी), १ टीस्पून तेल, १/२ टेबलस्पून सोयासॉस,
५ मोठ्या लसूण पाकळ्या, १/२ इंच आलं, १ टेबलस्पून मसाला चिली सॉस, चवीपुरत मीठ,
१/२ टीस्पून व्हिनेगर, १ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट
भाज्या --> भोपळी मिरची, गाजर, कोबी, मश्रूम, पाती कांदा सर्व भाज्या पातळ उभ्या चिरून घ्याव्यात.
(सर्व भाज्या समसमान प्रमाणात तसेच शिजलेल्या नुडल्सच्या १/३ प्रमाणात घ्यावेत.)
२ ते ३ टेबलस्पून पाती कांदा बारीक चिरून

कृती : १) जवळजवळ ६ कप पाणी मोठ्या पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात १/२ चमचा मीठ टाकावे.
पाणी उकळले कि त्यात नुडल्स घालून शिजू द्याव्यात. नुडल्स ९०% शिजल्यावर लगेच गार पाण्यात
घालाव्यात. २) लसूण + आलं + चिली सॉस + टोमॅटो पेस्ट एकत्र बनवून बारीक पेस्ट बनवावी.
३) कढईत तेल तापवावे. त्यात तयार केलेली पेस्ट घालून परतावे. काही सेकंद परतावे.
४ ) भाज्या घालून साधारण १० ते १२ सेकंद मोठ्या आचेवर परतावे. नंतर नुडल्स मधील पाणी काढून
त्या घालाव्यात. सोयासॉस घालून निट मिक्स करावे. शेवटी व्हिनेगर घालून मिक्स करावे. हवे असल्यास
थोडेसे मीठ घालावे. पाती कांदा वर सजवावा व गरमागरम सर्व्ह करावे.

टिपा : १) हक्का नुडल्स खास मुलांसाठी बनविताना चिली सॉस न वापरता साधा टोमॅटो सॉस वापरावा
तसेच आलं लसूण सुध्दा तिखटपणा वाढवते त्याचे प्रमाण थोडे कमी करावे.
२) मसाला चिली सॉस बऱ्या पैकी तिखट असतो पण अजून तिखटपणा वाढवायचा असल्यास चिमुटभर
रेड चिली फ्लेक्स नुडल्स वर पेरावे.

 

चिकन चिली फ्राय



साहित्य : चिकनचे साधारण ब्रेस्ट किंवा लेग्जचे ५-६ पिसेस, १ चमचा आल्याचा कीस, ६ लसून पाकळ्या ठेचून,
८ लाल मिरच्या, ४ अंडी, १/२ चमचा मिरपूड, १ वाटी ब्रेडक्रम्स (ब्रेड चा चुरा), तेल, १+१/२ चमचा मीठ, १ चमचा सोयासॉस.

कृती : एका सॉसपॅनमध्ये १/२ चमचा मीठ, सोयासॉस आणि १+१/२ वाटी पाणी घालावे. त्यात चिकनचे तुकडे
सुरीने खाच्या पाडून टाकावे व झाकण घालून शिजू ध्यावे.
दरम्यान लसून, आले, मिरच्या एकत्र वाटून घ्यावे. अंडी फोडून खूप खूप फेटून घ्यावे. शिजवलेले चिकनचे पिसेस घेऊन
त्याना वाटण लावावे व वरून उरलेले मीठ तसेच मिरपूड भुरभुरावी. ब्रेडक्रम्स मध्ये घोलावावे व अंड्यात बुडवून तळावे.

 

चिकन चिली ड्राय


साहित्य : २ वाटया चिकनचे बोनलेस तुकडे, २ कांदे, २ सिमला मिरची, ६-७ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून मीठ,
१ टीस्पून मिरीपावडर, १ टेबलस्पून सोया सॉस, १/४ टीस्पून अजिनोमोटो, १ टीस्पून कॉर्नफ्लोअर, तेल,
१ टीस्पून मैदा, दिढ टीस्पून साखर, एक अंड

वाटण : ७-८ लसूण पाकळ्या, १/२ इंच आले, ४-५ हिरव्या मिरच्या (सर्व जाडसर वाटावे.)

कृती : चिकनच्या तुकड्याना १/४ टीस्पून मिरी पावडर, कॉर्नफ्लोअर, मैदा, अंड, एक चिमुट अजिनोमोटो,
१/२ टीस्पून मीठ लावून अर्धा तास ठेवावे व कढईत तेल चांगले तापल्यावर चिकनचे तुकडे घालून मंद गॅसवर
लाल रंगावर तळून काढावेत. सिमला मिरची व कांदा उभा पातळ चिरावा व कांद्याच्या पाकळ्या सुटया कराव्यात.
मिरच्या उभ्या चिराव्यात. पॅनमध्ये २-३ टेबलस्पून तेल तापल्यावर वाटलेले आले, लसून, मिरची घालून
गुलाबी रंगावर तळावे व त्यावर चिरलेल्या मिरच्या, कांदा तळून व सिमला मिरची घालून परतावे.
नंतर त्यावर थोडे पाणी शिंपडावे व त्यात सोया सॉस, १/४ अजिनोमोटो, मिरीपावडर, १/४ टीस्पून मीठ,
साखर घालून परतून पाणी सुकवावे व नंतर त्यात तळलेले चिकनचे तुकडे घालून परतावे
व गरमा गरम सर्व्ह करावे.

 

 

 

 

 

 

 

 

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS