BREAKING NEWS

< >

cooking tips

 

काही महत्वाच्या टिप्स ( Cooking tips in marathi )

 

कान्दा कापताना पानी येउ नये म्हणून शेजारी मेणबत्ती जाळावी. 
कान्दा कापल्यावर एक वायु त्यातुन निघतो ज्या मुळे डोळ्यातून पाणी येत. आणी शेजारी जर मेणबत्ति असेल तर त्या ज्योती मुळे हा वायु जळतो आणी डोळ्यातुन पाणी येत नाही.
 
2.  पाक उरलाय...
 
a .उरलेल्या पाकाचा नेहेमी सुधारस करतात. पाकात थोडा लिम्बाचा रस पिळायचा आणी बदाम, बेदाणे, काजू असा हवा तो सुका-मेवा घालायचा. Pओळीला लावून खायला छान लागतो.

b.उरलेल्या पाकात कणिक भिजून पुऱ्या किंवा पोळ्या करता येतील .

c .शेवयाची खीर करताना पाक वापरला तर त्याचा लगदा होत नाही, त्यामुळे असा उरलेला पाक त्यासाठी वापरता येईल. तसेच फ़्रुट सलाड, मिल्क शेक यासाठी पण वापराता येतो. फ़ालुदा पण करता येईल
 
 
3. पुदीना उरला आहे, तो कसा टिकवता येईल.?
पुदुना, फ़्रीजमधे रुमालात गुंडाळुन ठेवला तर हळु हळु सुकत जातो, मग त्याची पुड करुन ठेवता येते. किंवा ताजा पुदीना बारिक वाटुन त्यात थोडे पाणी मिसळुन त्याचे आईस क्युब्ज करायचे आणि ते काढुन एका प्लॅष्टिकच्या बॅगमधे भरुन ठेवायचे. हे क्युब्ज जलजीरा मधे वापरता येतात. 
पुदिन्याची तयार पुड बाजारात मिळते. ती खास तंत्राने वाळवलेली असल्याने, हिरवीगार असते.
 
 
4.पोळी करुन झाली की ती पोळपाटावर झटकून घेतली तर पिठाचे कण पोळपाटावर सांडतात. मग ही पोळी पोळ्यांच्या hot pot मिळतो त्यात ठेवायच्या. असे जर केले तर पोळ्या गरम राहतात. काचेच्या बाऊल मधे त्यांना घाम येईल बहुतेक. कोरड्या कापडात शिदोरीसारख्या पोळ्या ठेवल्या तर सर्वात छान राहतात.
 
5. कुठलेही पदार्थ तळण्या आधी तेलात एक दोन चिमुट मिठ टाकावे पदर्थ तेलकट होत नाही
 
6. हिरव्या पालेभाज्या साफ़ करुन पेपर मधे व्रॅप करुन प्लस्टिक बॅग मधे घालुन फ़्रिज मधे ठेवा, ८-१० दिवस छान रहातात.
 
 
7. भरितासाठी वांगे भाजल्यावर ५-१० मिनिटे पातेल्यात झाकण लावुन ठेवावे. नंतर सरळ देठाला धरुन नळाखाली धरावे, एकदम साफ़ होते.
 
8. पुरण पातळ झाले तर थोडा खाण्याचा सोडा टाकुन परत शिजवावे. पुरण घट्ट होते.
 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS