BREAKING NEWS

< >

diabetes recipes

 

 

मधुमेहींनी आहारात काही निवडक पदार्थ वज्र्य केले, तर त्यांचं जगणं सुसह्य व्हायला खूप मदत होईल.
साखरयुक्त मिठाई, आइस्क्रीम, कँडी, चॉकलेट इत्यादी पदार्थ टाळणं अत्यंत आवयक आहे.
त्याचप्रमाणे पिष्टमय पदार्थ असलेले बटाटे, रताळी इत्यादी पदार्थ, तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, अंडी, मटण, पनीर, चीज, खवा, लोणी मधुमेहींनी शक्यतो टाळावीच.
गोड फळं उदा. आंबा, केळी, चिकू, द्राक्षं इत्यादी फळंसुद्धा टाळणं गरजेचं आहे.
त्याऐवजी संत्र, मोसंब, पेर, पपया, सफरचंद, आवळा, जांभूळ, कलिंगड ही फळं खावीत.

मासे खाताना तळण्याऐवजी कालवण करून किंवा ओव्हनमध्ये भाजून खावेत.
चोथायुक्त (फायबर) फळभाज्या, पालेभाज्या, वेलभाज्या खाव्यात. शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा खाल्लेल्या चांगल्या.
भूक लागल्यावर गाजर, काकडी भरपूर खावी.
चपाती, भाकरीचं पीठ कोंडायुक्त असेल याकडे कटाक्ष ठेवावा.
म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध वापरावं.
स्कीम मिल्क सर्वात उत्तम. त्याचंच दही, ताक खावं. तेलाचा वापर फक्त फोडणीसाठी करावा.
एरवी शक्यतो भाजणं, उकडणं, वाफवणं यावरच भर द्यावा.
प्रत्येक मधुमेहीचा आहार, त्याचं वजन, मधुमेहाची तीव्रता आणि इतर शारीरिक आजार इत्यादी गोष्टींनुसार वेगळा असतो.
त्यामुळे एकदुस-याचं अनुकरण करू नये.
थोडक्यात, मोजून मापून भोजन घेणं हेच मधुमेह आटोक्यात ठेवण्याचं रहस्य आहे.

 

नाचणी आणि कारल्याचा उत्तपा
Ragi & Karela Uttapa

साहित्य
नाचणी पीठ: २ वाटी
बेसन अथवा तांदळाचे पीठ: १ वाटी
बारीक कापलेले कार्ले: १ वाटी
बारीक चिरलेला कांदा: १/४ वाटी
बारीक चिरलेला टोमॅटो: १/४ वाटी
बारीक चिरलेले गाजर: १/४ वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर: १/४ वाटी
बारीक चिरलेली हिरवी मिरची: २ टी स्पून
तेल
चवीपुरते मीठ
पाणी

कृती
तेल सोडून वर दिलेले सगळे साहित्य एकत्र करून छान से पीठ भिजवा. हे पीठ जास्त पातळ पण असु नये आणि जास्त घट्ट पण असु नये.

एक नॉन स्टिक तवा गरम करा. त्यावर थोडे तेल सोडा आणि मग त्यावर १ डाव पीठ टाकून ते चांगले गोल पसरवा. त्या पसरवलेल्या पीठाच्या बाजूने थोडे तेल सोडा आणि तो उत्तपा झाकून ठेवा. २ मिनिटनंतर तो उत्तपा उलटून त्या बाजूने सुद्धा चांगला भाजा.

हा गरमागरम उत्तपा तुम्ही कुठल्याही चटणी अथवा सॉस अथवा लोणच्या बरोबर खाऊ शकता. हा उत्तपा डायाबेटीस असलेल्याना फार चांगला आहे.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS