fast food recipes
रवाढोकला
साहित्य:
१) 2 वाट्या जाडसर रवा , अर्धी वाटी बेसन ,
२) हिरवी मिरची जिरे ,आले व चालत असल्यास लसुत वाटून १ टेबलस्पून ,
३) कोथिंबीर, ताक किंवा दही ,मीठ साखर,
४) १ टेस्पून सोडा सपाट ,अर्धा टेस्पून लीम्बुरस,१ टेस्पून तेल, १ टेबलस्पून तेलाची फोडणी .
कृती:
१) रवा ,बेसन ,वाटण ,मीठ दही, टाकत भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून दोन तास ठेवावे.
२) कुकरमध्ये पाणी उकळत ठेवून कुकरचा रिकामा डबा आत ठेवावा.
३) रव्याच्या मिश्रणात सोडा त्यावर लीम्बुरस घालावे .
४) तेल घालून जोरात ढवळून कुकरचा गरम डबा खाली काढून त्यात पीठ ओतावे.
५) ताबडतोब कुकरमध्ये ठेवून झाकण ठेवावे (शिटी न लावता ).
१०-१५ मिनिटे शिजवून उतरवावे .
६) झाकण ५ मिनिटांनी काढून ढोकला बाहेर काढावा .
७) फोडणी करून खाली उतरवून त्यात २ टेबलस्पून पाणी घालावे.
८) धोक्ल्याच्या वड्या पडून वर फोडणी घालावी .पाण्यामुळे ढोकला छान मऊ होईल .
९) कोथिंबीर पेरावी .आधी करून ठेवता येतो .
RELATED POSTS
marathi food recipes
marathi food recipes in marathi
marathi food recipe
food recipes in marathi
food recipes
fast food recipes
punjabi food recipes
food recipe
veg food recipes
kerala food recipes