BREAKING NEWS

< >

fast recipes in marathi

 

साबुदाणा वडे  : fast recipes in marathi

 

साहित्य :-

१)      दोन वाटया भिजवलेले साबुदाणे

२)      चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे

३)      एक वाटी शेंगदाण्याचा कूट

४)      चार ते पाच हिरव्या मिरच्या

५)      एक चमचा जिरे

६)      तळण्यासाठी तेल

७)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      भिजवलेले साबुदाणे , शेंगदाण्याचा कूट व उकडलेले बटाटे कुस्करून एकत्र करावेत . 

२)      तयार केलेल्या मिश्रणात हिरवी मिरची बारीक चिरून एकत्र करून घ्यावी . 

३)      एक चमचा जिरे टाकून या मिश्रणात चवीपुरते मीठ टाकावे व त्याचे चपटे गोळे     बनवून तेलात तळावेत . 

 

 दही साबुदाणा

 

साहित्य :-

१)      एक वाटी साबुदाणा

२)      एक वाटी दही

३)      लागेल तसं दुध

४)      मीठ-मिरची चुरडून

५)      अर्धा चमचा जिरं

६)      एक चमचा साजूक तूप

७)      चवीला साखर . 

कृती :-

१)      मोठया कढाईत साबुदाणा लाही फुटेपर्यंत भाजून घ्या .  तुपाची जिरं       घालून फोडणी करा . 

२)      इतर सर्व गोष्टी घालून कालवून ठेवा .  वाटल्यास दुध घाला .  हवा     असल्यास शेंगदाण्याचा कूट घाला . 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS