BREAKING NEWS

< >

global warming marathi

 

ग्लोबल वार्मिंग....!  

ह्यालाच मराठीत ‘वैश्विक तापमानवाढ’ असे म्हणतात! आज संपूर्ण जगासमोर भेडसावत असलेल्या सगळ्या समस्यांपेक्षा सर्वांत भयानक अशी ही समस्या आहे आणि हे संपूर्ण जगाने मान्य केलं आहे! कालानुरूप मानव प्रगती करत गेला, औद्योगिक क्रांती झाली! मात्र हीच औद्योगिक क्रांती ‘वैश्विक तापमानवाढी’चे प्रमुख कारण होवून बसली आहे. हरीतवायूचे मोठया प्रमाणावरील उत्सर्जन वैश्विक तापमानवाढीला कारणीभूत ठरले आहे. सर्वच देशांनी औद्योगिक क्रांतीचा मार्ग अवलंबिला आहे, त्यामुळे सगळ्याच देशातून हरीतवायू उत्सर्जित केले जातात मात्र सगळ्यात जास्त हरितवायू अमेरिका, युरोप, चीन, जपान हे देश उत्सर्जित करतात जे वैश्विक तापमानवाढीला जबाबदार ठरले आहेत. वैश्विक तापमानवाढीमुळे अनेक हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, बर्फाच्छादित पर्वत तसेच खंड वितळत चालले आहेत. ह्यामुळे अनेक देशांच्या सरासरी तापमानात वाढ होत चालली आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली असून भविष्यात अनेक महत्वाच्या शहरांना धोका संभवतो. ह्यावर एकमेव उपाय म्हणजे हरीतवायूचे उत्सर्जन आटोक्यात आणणे. त्यासाठी सर्व देशांचा जागतिक करार देखील झाला आहे, मात्र जर्मनी वगळता एकही देश ह्या कराराचे पालन करतांना दिसत नाही. कारण, हरीतवायुचे उत्सर्जन कमी करणे, म्हणजेच औद्योगिक प्रकल्पांना आळा घालणे आणि त्यामुळे आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागण्याची भीती प्रत्येक राष्ट्राला वाटते.      

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS