BREAKING NEWS

< >

indian curry

 

लाल भोपळा

 

साहित्य :-

१)      लाल भोपळा अर्धा किलो

२)      खसखस एक चमचा

३)      लसूण पाकळ्या सहा-सात

४)      आलं पाव इंच

५)      मध्यम आकाराचे कांदे दोन-तीन

६)      खोबऱ्याचा कीस पाव वाटी

७)      हळद , तिखट अर्धा चमचा

८)      तेल पाव वाटी , कोथिंबीर पाव वाटी

९)      चविपुरत मीठ .

कृती :-

१)      प्रथम खसखस चांगली भाजून घ्यावी .  सुकं खोबरंही भाजून घ्यावं .  कांदे चरून घ्यावे .

२)      भोपळ्याच्या सालीसकट मोठ्या फोडी कराव्यात .  खसखस , सुकं खोबरं ,  लसूण , आलं आणि चिरलेला कांदा वाटून घ्यावं .

३)      पाव वाटी तेलावर वाटण चांगलं परतावं .  भोपळ्याच्या फोडी या वाटणात परतून त्यात दोन-तीन वाट्या पाणी घालावं . 

४)      रश्श्याला उकळी आल्यावर त्यात तिखट , मीठ घालावं .  मग मंद आचेवर ठेवून भाजी चांगली शिजू द्यावी . 

५)      भाजीचा लगदा होईल इतकी शिजवू नये .  फोडीची पाठ करकरीत राहिली   पाहिजे .

६)      तिखट फोडणीत घालू नये , नंतर घातल्यास त्याची चवही छान लागते आणि भाजीला रंगही छान येतो .

७)      भाजी अर्धवट शिजल्यावर त्यात निम्मी कोथिंबीर घालावी .  भाजी पूर्ण शिजल्यावर उरलेली कोथिंबीर त्यावर पेरावी .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS