टमाटो रस्सा indian curry recipe
साहित्य :-
१) लाल टमाटो पाव किलो
२) कांदे दोन , गूळ अर्धी वाटी
३) लसूण पाकळ्या चार-पाच
४) आलं एक इंच , हळद एक चमचा
५) गरम मसाला अर्धा चमचा
६) लाल तिखट एक चमचा
७) कोथिंबीर अर्धी वाटी
८) जिरं अर्धा चमचा
९) मोहरी , तेल पळीभर
१०) चवीपुरतं मीठ .
कृती :-
१) टमाटो धुऊन बारीक चिरावेत . कांदा बारीक चिरावा . लसूण-आलं ठेचून घ्यावं .
२) जिरं-मोहरीची फोडणी करून त्यात ठेचलेलं आलं-लसूण घालावं .
३) कांदा घालावा व परतावं . चिरलेले टमाटो घालावेत .
४) त्यावर तिखट , हळद , गरम मसाला घालावा . एकत्र करून हलवावं .
५) मग गूळ , कोथिंबीर , मीठ घालावं . पाच मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून भाजी शिजवावी .
RELATED POSTS
curry recipes
indian curry
indian curries
indian curry recipe
beef curry recipe
indian curries recipes
sol kadhi recipe in marathi