BREAKING NEWS

< >

indian recipes in marathi

 

शाही भेंडी मसाला 

 indian recipes in marathi

साहित्य :-

१)      कोवळी भेंडी अर्धा किलो

२)      जिरं व मोहरी प्रत्येकी एक चमचा

३)      उडीद डाळ दोन मोठे चमचे

४)      सुक्या मिरच्या चार-पाच

५)      कढीपत्त्याची पानं आठ-दहा

६)      बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी

७)      टोमाटोच्या फोडी एक वाटी

८)      लाल तिखट एक चमचा

९)      हळद अर्धा चमचा

१०)  गरम मसाला एक चमचा

११)  धनेपूड एक मोठ चमचा

१२)  ओलं खोबरं एक वाटी

१३)  काजूचे तुकडे पाव वाटी

१४)  दही अर्धी वाटी , थोडी कोथिंबीर

१५)  तळण्यासाठी तेल , चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      भेंडी धुवून , पुसून , शेंडे-बुडखे काढून टाकावे .  त्यांचे प्रत्येकी दीड         दोन इंच लांबीचे तुकडे करून तेलात लालसर तळून घ्यावे . 

२)      काजू व ओलं खोबरं वाटून घ्यावं .  मिरच्यांचे तुकडे करावे . 

३)      पसरट भांडयात उरलेलं तेल तापवून त्यात जिरं , मोहरी , उडीद डाळ ,     सुक्या मिरच्या व कढीपत्ता फोडणीला घालावा . 

४)      त्यावर कांदा लाल करून हळद , तिखट मसाला व धनेपूड घालावी . 

५)      त्यावर काजू-खोबऱ्याची पेस्ट , टोमाटो व हलकं फेटून दही घालवं . 

६)      गरजेनुसार मीठ घालून ग्रेव्ही उकळू दयावी .  नंतर त्यात तळलेली भेंडी        व त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून दयावं . 

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS