BREAKING NEWS

< >

indian vegetarian cooking recipes

 

फणसाची कढी : indian vegetarian cooking recipes in marathi

 

साहित्य :-

१)      कापा फणसाचे गरे बारा ते चौदा

२)      आंब्याच्या फोडी वाटीभर

३)      एका नारळाचं दुध

४)      तूप पाव वाटी

५)      जिरं , तिखट

६)      मीठ चवीनुसार

७)      अर्धा चमचा हळद .

कृती :-

१)      फणसाच्या गऱ्यातल्या आठळ्या काढून टाकाव्यात व गऱ्याचे तुकडे करावे .

२)      एका मोठया आंब्याच्या साली काढून फोडी कराव्या .

३)      तुपाची जिरं घालून फोडणी करावी .  त्यात हळद , तिखट घालून त्यावर आंब्याच्या व गऱ्याच्या फोडी टाकाव्या .

४)      एक वाफ आल्यावर त्यात दुध टाकून चांगली उकळून घ्यावं . 

५)      फोडी शिजल्यानंतर चांगलं घोटून घ्यावं .  घट्ट झालं तर परत थोडं दुध घालावं .

६)      चमच्यानं सारखं करून घ्यावं .  आचेवरून खाली उतरवावं आणि नंतर त्यात मीठ घालावं .

७)      जर आधी मीठ घातलं तर दुध फाटून जाईल .  म्हणून शेवटी मीठ घालावं .  तांदळाच्या भाकरीबरोबर ही कढी खूप छान लागते .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS