BREAKING NEWS

< >

janampatrika in marathi

 

जन्मपत्रिका 

 

आपली संस्कृती भरपूर साऱ्या गोष्टी ना जोपासत पुढे आली आहे . भरपूर तरुण मुला मुलीना वाटत कि का हे साले बघतात . तर थोडक्यात जाणून घेऊ काय असते जन्मपत्रिका आणि कुंडली .
जन्म-नक्षत्र, राशी, जन्म-पत्रिका व त्यांचे योग याचे विश्लेषण करून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, प्रकृती, रंग व चांगल्या- वाईट वेळेबरोबर भूत, भविष्य, वर्तमान यांना जाणून घेण्यासाठी जन्मपत्रिका तयार केली जाते. जन्मपत्रिका तयार करणे गणिती व शास्त्रीय काम आहे. 


जन्मपत्रिकेचा व ज्योतिषशास्त्र तसेच ज्या जागेवर व्यक्तीचा जन्म झाला आहे त्याचा  परस्परसंबंध असतो . व्यक्तीचे नाव, जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मठिकाण यांच्या मदतीने पत्रिका बनवली जाते. यात जातकाच्या नावापासून आशय जातकाचे कुटुंब, वर्ण, संस्कार आणि वर्णानुसार आई-वडिलांच्या व्यवसायाशीही संबंध देतात. जन्मवेळ आणि जन्मतारखेत संपूर्ण कालचक्र म्हणजेच ज्योतिषाचा समावेश होतो. जातकाच्या जन्म ठिकाणापासून आशय जातकाचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला आहे तो किती अक्षांशावर राहतो ही सर्व माहिती वास्तुशास्त्रातील आहे.

हल्ली कॉम्प्युटरवर सोप्या पद्धतीने जन्मकुंडली तयार केली जाते. कॉम्प्युटर वर योग्य पंचांगांच्या मदतीने सॉफ्टवेअर बनवले असेल तर योग्य जन्मवेळ, जन्म तारीख, जन्म ठिकाण दिले गेले तर पत्रिकेत त्रुटींची शक्यता कमी होते.

 

अधिक माहिती आम्ही लवकरच या सदरात टाकू इच्छितो . तुमच्या कडे या विषयाबद्दल माहिती असल्यास आम्हाला info@m4marathi.com या मेल आयडी वर पाठवा .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS