BREAKING NEWS

< >

kana poem by kusumagraj

 

कणा

 kana poem by kusumagraj

"ओळखलंत का सर मला ?" पावसात आला कोणी ?

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी !

 

क्षणभर बसला, नंतर हसला ,बोलला वरती पाहून

'गंगामाई' पाहुणी आली, गेली घरट्यात राहून !

 

माहेरवाशीण पोरीसारखी, चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी ? बायको मात्र वाचली !

 

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हतेन्हेले,

प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये, पाणी थोडे ठेवले !

 

कारभारणीला घेऊनी संगे, सर ! आता लढतो आहे,

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे !

 

खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला,

पैसे नकोत सर ! जरा एकटेपणा वाटला !

 

मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा

पाठीवरी हात ठेउनी, नुसतं “लढ” म्हणा !

 

                                     - कुसुमाग्रज

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS