BREAKING NEWS

< >

khandeshi khichdi in marathi

 

 

साहित्य

तूर डाळ ३ वाट्या, तानदूळ २ वाट्या
टोमॅटो १,कान्दे २,
फ़ोडणीसाठी-आले लसूण पेस्ट १ चमचा,लाल मिरच्या २ ,तेल,हिन्ग , गरम मसाला १ चमचा, तमालपत्र २,दालचिनी १, जिरे मोहरी १ चमचा
मीट,साखर १ चमचा,
हळद, लाल तिखट १/२ चमचा प्रत्येकी,कोथिम्बीर

साजूक तूप आवडीप्रमाणे :)

कृती

प्रथम तूर डाळ नीट धुऊन कूकरमध्ये शिजवून घ्यावी. तांदूळ धुऊन भिजत ठेवावेत. डाळ रवीने नेहमीप्रमाणे हाटून घ्या. लहान कूकरमध्ये तेल घालून त्यात तमालपत्र ,दालचिनी  घालून परता . आता जिरे मोहरी , हिंग , आणि मिरच्यांचे प्रत्येकी दोन तुकडे करून घाला. आता कांदा बारीक चिरून घाला. कांदा खमंग परतल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला.( कांद्यानंतर आले लसूण पेस्ट घालण्यामागे ती पेस्ट कढईला चिकटू नये हा हेतू...) आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो चांगला मऊ होईपर्यंत परता.आता त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून परता. मंद आचेवर थोडे शिजू द्या.आता त्यात शिजवलेली डाळ घालून त्यात (साधारणपणे या प्रमाणातील डाळ तांदूळ शिजण्यासाठी जेवढे पाणी लागते त्यांपेक्षा जास्त )पाणी घालावे.भिजवलेला तांदूळ त्यात घालावा. नीट ढवळून मीठ घाला, वरून कोथिंबीर घालून शिजू द्या. गरम असतानाच साजूक तूप घालून खायला द्या..
टीपा
हा पदार्थ घट्ट न होता पातळच राहू द्यावा म्हणजे चमच्याने खाण्याइतपत पातळ असावा.. त्यातच खरी मज्जा आहे.

सोबत पापड द्यायला/घ्यायला विसरू नका..

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS